लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख रुपयांचं कर्ज, त्या कर्मचाय्रांसाठी आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवणार –  निर्मला सीतारामण

लघु आणि कुटीर उद्योगांसाठी 3 लाख रुपयांचं कर्ज, त्या कर्मचाय्रांसाठी आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवणार – निर्मला सीतारामण

नवी दिल्ली – आत्मनिर्भर भारत या अभियानामुळे देशभरात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात गरिबांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी दिली आहे. तसेच लघु आणि कुटीर उद्योगांसाठी कोणत्याही गँरंटीशिवाय 3 लाख रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. 45 लाख लघु उद्योगांना 31 ऑक्टोबरपासून याचा फायदा मिळणार असल्याचंही सितारामण यांनी म्हटलं आहे.केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी 20 लाख कोटींचे पॅकेज विस्तृत सांगितले.

तसेच ‘कोरोना’ संकटकाळात उद्योगधंदे पुन्हा हळूहळू मार्गावर येत असताना आर्थिक बोजा कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने सहाय्य दिले होते. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वाटणीचे 12 टक्के आणि नियोक्ता किंवा कंपनीचे 12 टक्के योगदानही केंद्राच्या तिजोरीतून दिले जात होते. त्यानंतर आता आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचं सितारामण यांनी म्हटलं आहे.

COMMENTS