मुंबई – शिवसेना आणि भाजप सत्तेत असूनसुद्धा एकमेकांवर टीका करताना दिसतात. याचदरम्यान काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचे इशारे देणाऱ्या शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
हेराफेरी या हिंदी चित्रपटातील एक प्रसंग नितेश राणे यांनी मॉर्फ केला आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर या चित्रपटातील परेश रावल यांच्या चेहऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा, अक्षय कुमारच्या चेहऱ्यावर उद्धव ठाकरेंचा चेहरा आणि सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांचा चेहरा लावून पोस्ट केला आहे. अक्षय कुमारला घर सोडून देण्याचा परेश रावल इशारा देत असतो. अक्षय परेश रावलनी जायला सांगितल्यावर तात्पुरते जातो, पण परत घरात येऊन मी घरभाडे दिल्याशिवाय जाणार नाही असे सांगतो. मग परेश रावल म्हणतो की याचा अर्थ तू घरातून कधीही जाणार नाही. उद्धव ठाकरे जेव्हा सरकारला सत्तेतून बाहेर पडण्याची धमकी देतात तेव्हा काय होते असे लिहून हा व्हिडिओ राणे यांनी ट्विट केला आहे. ज्याने कोणी हा व्हिडिओ तयार केला आहे तो जिनिअस आहे आणि प्रासंगिकही, तसेच हा व्हिडीओ आपण तयार केला नसल्याचे नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
???????????????????? pic.twitter.com/wsoCAWEzzr
— nitesh rane (@NiteshNRane) November 28, 2017
Video not done by me ..but well done by some genius ! It’s hilarious and so apt!!
— nitesh rane (@NiteshNRane) November 28, 2017
COMMENTS