पहिले आमचे छत्रपती मग जाऊन करा अयोध्येत आरती, नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी !

पहिले आमचे छत्रपती मग जाऊन करा अयोध्येत आरती, नितेश राणेंची शिवसेनेवर कुरघोडी !

मुंबई – काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारलं आहे. याबाबतचं ट्वीट नितेश राणे यांनी केलं असून आम्ही दिलेले शब्द पाळतो, पहिले आमचे छत्रपती मग जाऊन करा अयोध्येत आरती’ असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर छत्र उभारण्याचं आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळलं नसल्यामुळे त्यांनी नितेश राणे यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान उद्धव ठाकरे हे नेहमी भगव्याचं राजकारण करत आले आहेत. आता अयोध्येला जाण्यामागेही राजकारणच आहे. मंदिर उभारण्याची उद्धव ठाकरेंची कुवत नाही असा निशाणाही नितेश राणे यांनी लगावला आहे. शिवाजी महाराजांना उन्हातान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे. चार मार्चला पुतळ्याचं पूजन करून शिवसेनेने शिवजयंतीही साजरी केली होती. मात्र छत्र उभारण्याचा बहुदा शिवसेनेला विसर पडला असावा असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS