मुंबई – 25 जून रोजी होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना पुन्हा एकदा आमनेसामने उभे ठाकण्याची चिन्ह दिसत आहेत. काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. नार्वेकर यांच्या पत्नी मीरा यांचे मतदार यादीत 6 वेळा नाव नोंदवल्याची बाब नितेश यांनी निदर्शनास आणली असून यापद्धतींनं शिवसेनेला मुंबई पदवीधर निवडणूक जिंकायची आहे का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला आहे.
Uddhav Thackeray’s PA Milind Narvekers wife’s name comes up 6 times in Malad Vidhan Sabha list..pin code 64.. so this how Sena is goin to win the Mumbai graduate seat? pic.twitter.com/doZHFOO7io
— nitesh rane (@NiteshNRane) June 15, 2018
दरम्यान नारायण राणे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र् स्वाभिमान पक्षानं राजू बंडगर या उमेदवाराला निवडणुकीत पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे मुंबई पदवीधर निवडणूक आता चांगलीच गाजणार असून राणे आणि शिवसेना आमनेससामने आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS