जाहीर सभेतील टिकेमुळे नितीन गडकरी व्यतिथ, राज ठाकरेंना पाठवली कामांची यादी !

जाहीर सभेतील टिकेमुळे नितीन गडकरी व्यतिथ, राज ठाकरेंना पाठवली कामांची यादी !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केलेल्या टिकेमुळे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक विकास आणि पाणीपुरवठा मंत्री नितीन गडकरी व्यतिथ झाले असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे यांच्या टिकेनंतर नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना कृष्णकुंजवर राज्यात केलेल्या रस्ते विकास कामांची पत्राद्वारे यादी पाठवली आहे. यामध्ये त्यांनी सुमारे 5 लाख कोटींची कामे सुरु झाली असल्याचा दावा केला आहे. त्यापैकी 4 लाख 27 कोटींच्या कामांची यादी त्यांनी राज ठाकरेंना पाठवली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी नितीन गडकरींच्या रस्ते विकास कामांच्या घोषणांची साबणाचे बुडबुडे म्हणून खिल्ली उडवली होती. त्यानंतर गडकरी यांनी राज्यातील कामांची यादी पाठवली असून मी पाठवलेल्या कामांच्या यादीबद्दल शंका असल्यास शिवाजी पार्कवर जाहीर चर्चा करण्याची तयारी गडकरी यांनी दर्शवली आहे. राज ठाकरे यांच्या रविवारी झालेल्या भाषणानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी गडकरी यांनी कृष्णकुंजवर कामांची यादी पाठवली असल्याची माहिती आहे.

COMMENTS