मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्या नावावर सर्वसंमती बनू शकते अशी चर्चा आहे. त्याबाबत गडकरींना विचारलं असता आपण स्वप्न पाहत नाही, जे लोक मला जवळून ओळखतात त्यांना हे माहित आहे. तसेच पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. तसेच २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदी कायम राहतील असंही गडकरींनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेनेबरोबर कुरबुरी असल्या तरी आम्हाला शिवसेनेसोबत आघाडी हवी आहे. शिवसेनेबरोबर आमचे दृढ संबंध असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे. शिवसेना हा भाजपाचा जुना मित्र पक्ष आहे. पण २०१४ विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाला.शिवसेना केंद्रात आणि राज्यातील सत्तेत भाजपासोबत सहभागी असली तरी सत्तेत अपेक्षित वाटा न मिळाल्यामुळे सातत्याने शिवसेनेकडून भाजपावर टीका सुरु असल्याचंही गडकरींनी म्हटलं आहे.
COMMENTS