पंतप्रधान मोदींच्या दौ-याआधी शिवसेना-भाजपमध्ये तणाव, केडीएमसीतील नगरसेवकानं दिला राजीनामा !

पंतप्रधान मोदींच्या दौ-याआधी शिवसेना-भाजपमध्ये तणाव, केडीएमसीतील नगरसेवकानं दिला राजीनामा !

मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याआधी शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेती शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी राजीनामा दिला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात केडीएमसी महापौरांना स्थान न दिल्याने त्यांनी राजीनामा दिला असून युती तोडण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला जाऊ नये, असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला असल्याची माहिती आहे. विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येत आहेत. या उद्घाटन सोहळ्याचं शिवसेना मंत्र्यांना निमंत्रण असलं तरीही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच आता मोदींच्या या कार्यक्रमाला मंत्र्यांनाही न पाठवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे.

उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर आता निमंत्रण असूनही राज्यमंत्री विजय शिवतारे हे पुण्याच्या तर एकनाथ शिंदे हे कल्याण इथल्या मेट्रो प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमाला जाणार नाहीत. यानिमित्ताने पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमधील श्रेयवादाची लढाई समोर आली आहे.

 

COMMENTS