मोदी – शहा पटेलांपुढे झुकले, नाराज नितीन पटेलांना अखेर अर्थमंत्रालय मिळाले !

मोदी – शहा पटेलांपुढे झुकले, नाराज नितीन पटेलांना अखेर अर्थमंत्रालय मिळाले !

अहमदाबाद – गुजरातमधील राजकीय संकट संपवण्यात अखेर भाजपला यश आले. मात्र त्यासाठी त्यांना नाराज नितीन पटेल यांच्यापुढे लोटांगण घालावं लागलं. गेल्यावेळी असेलेली अर्थमंत्रालय आणि शहर विकास मंत्रालय न मिळाल्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज होते. त्यामुळे खातेवाटपानंतर 3 दिवस मंत्रालयाचा कार्यभार स्विकारला नव्हता. अखेर आज चौथ्या दिवशी कार्यभार स्विकारला. सुरुवातीला कोणत्याही परिस्थितीत नितीन पटेल यांच्यासमोर झुकायचं नाही अशी भूमिका घेणा-या भाजप नेतृत्वाला अखेर त्यांच्यासमोर नमतं घ्यावं लागलं.  काल दिवसभर त्यांनी समर्थकांशी चर्चा केली. या प्रकरणाची भाजप हायकमांडने तीन दिवस दखल न घेतल्याने नितीन पटेल समर्थक संतप्त झाले होते. नितीन पटेल यांना गुजरातचे अडवाणी होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली होती.

गुजरातचे अडवाणी होऊ देणार नाही म्हणज्ये काय ?

२०१४ मध्ये ज्येष्ठतेनुसार आणि पक्षातील त्यांच्या योगदानानुसार ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. मात्र नरेंद्र मोदींची एन्ट्री झाली आणि अडवाणींच्या हातून पंतप्रधानपद दूर गेले. नंतर अडवाणींना कुठेच काही मिळाले नाही. पक्ष असो किंवा सरकार यातून अडवाणी कायमचे बेदखल झाले. त्याचप्रमाणे आनंदीबेन पटेल यांच्यानंतर नितीन पटेल यांच्याकडे येणं अपेक्षीत होतं. मात्र ते त्यांच्याकडं आलं नाही. आता महत्वाची खातेही त्यांच्याकडून हिरावून घेण्यात आली होती. त्यामुळे समर्थक नाराज झाले होते.

वादावर काय म्हणाले नितीन पटेल ?

दरम्यान नितीन पटेल यांनी आपण पदांसाठी नाही तर आत्मसन्मानासाठी लढत आहोत. याची पक्षाचे वरीष्ठ नेते दखल घेतील अशी अपेक्षावजा इशारा दिला होता. नाराज नितीन पटेल यांना हार्दिक पटेल यांनी ऑफर दिली होती. भाजपचे १० आमदार घेऊन बाहेर पडल्यास काँग्रेसच्या हायकमांडशी बोलून आणि काँग्रेसमध्ये योग्य पद देण्यासाठी प्रयत्न करु अशी हार्दीक पटेल यांनी नितीन पटेल यांना ऑफर दिली होती. त्यावर बोलताना हार्दिक किंवा इतर कोणाशीही बोलण्यास काही अडचण नाही अशी भूमिका नितीन पटेल यांनी घेतली होती.

 १ जानेवारीला मेहसाना बंदचे आवाहन !

नितीन पटेल यांच्या समर्थनार्थ पटेल एकत्र येताना दिसले. पटेल यांच्या निषेधार्थ म्हणज्ये उद्या मेहसाना बंदंची हाक देण्यात आली होती. सरदार वल्लभाई पटेल समितीतर्फे बंदीची हाक देण्यात आली होती. तसंच अन्याय दूर झाला नाही तर गुजरात बंदची हाक देण्याचा इशारा पटेलांनी दिला होता. या सर्वाचा परिपाक आज स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी नितीन पटेल यांना फोन करुन पदभार स्विकारण्याची विनंती केली. तसंच त्यांना अर्थखाते पुन्हा देण्यात आले.

COMMENTS