नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या गाड्या फोडल्या !

नाशिकमध्ये भाजप नगरसेवकांच्या गाड्या फोडल्या !

नाशिक – नाशिक शहराच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून नगरसेवकांच्या गाड्या फोडल्या असल्याची घटना घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे.

इंदिरानगर परिसरातील प्रभाग 30 मधील सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी या भाजप नगरसेवकांच्या गाड्या फोडल्या आहेत.  नगरसेवकांच्याच गाड्या फोडण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सध्या दहशतीचं वातावरण  आहे. तसेच या गाड्यांची तोडफोड कोणी केली हे अजून निष्पन्न झालं नसून अज्ञातांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं दरवाढीविरोधात सरकारचा निषेध केला आहे. याबाबत राष्ट्रवादीनं निषेधाचे बॅनर शहरात लावले असून सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे. पट्रोल, डिझेल आणि घरपट्टीच्या दरवाढीविरोधात राष्ट्रवादीने हे बॅनर लावले आहेत.

COMMENTS