लिंगायत समाजाला ओबीसींचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करणार – मुख्यमंत्री

लिंगायत समाजाला ओबीसींचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करणार – मुख्यमंत्री

सोलापूर – लिंगायत समाजाला ओबीसींचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारस करणार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. हिंदू लिंगायत असा उल्लेख असल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजाला ओबीसी समाजाचे प्रमाणपत्र मिळत नाही, असा उल्लेख पालकमंत्री श्री. देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकेत केला होता. त्याचा संदर्भ देत श्री. फडणवीस म्हणाले, लिंगायत समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात काही अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी ओबीसी समितीकडे शिफारस करण्यात येईल असं म्हटल आहे.तसेच मंगळवेढ्यातील महात्मा बसवेश्वरांच्या स्मारकाबाबत पंधरा दिवसांत निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सोलापुरातील बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने आयोजिलेल्या तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या श्री संकल्पसिद्धी कार्यमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह जगदगुरु उपस्थित होते. देव, देश, धर्म, संस्कृती व परंपरा  जपण्याचे काम जगदगुरूंनी केले, असा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. यावेळी मंत्री मुंडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

COMMENTS