स्वतःच्या लठ्ठपणाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री ?

स्वतःच्या लठ्ठपणाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री ?

पुणे – ‘लहान मुलांमधील लठ्ठपणा काय असतो याचं उदाहरण मी सुद्धा आहे. मी लहानपणी लठ्ठ होतो, आताही आहे, मध्यंतरी कमी झालो, परत वजन वाढलं, हे असंच सुरू आहे.’ अशी कबुली देऊन मुख्यमंत्र्यांनी एकच हशा पिकवली. तसंच आताही लठ्ठच असल्याचं मान्य करत मुख्यमंत्र्यांनी लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलंय.

पुण्यात रोटरी क्लबने लहान मुलांमधील लठ्ठपणाची अर्थात ओबेसिटीची वाढती समस्या लक्षात घेऊन ती कमी करण्यासाठी सुरू केलेल्या अभियानाचं उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

लहानपणी ओबेसिटी त्याची लक्षण किंवा योग्य आहार याबाबत आतासारखी जागरूक स्थिती नव्हती मात्र आता परिस्थिती बदलल्याच सांगत मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी प्रयत्न करावे लागणारं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

 

COMMENTS