दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील होणार पुण्याची सून !

दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटील होणार पुण्याची सून !

पुणे – माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांची कन्या आणि प्रदेश राष्ट्रवादी युवती काँग्रेसची प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील या पुण्याची सून होणार आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमशे थोरात यांचा पुतण्या आनंद थोरात यांच्याशी स्मिता पाटील यांचे लग्न ठरले आहे. येत्या 9 डिसेंबरला साखरपुडा होणार आहे. तर मे महिन्यात लग्न होणार आहे.  आनंद थोरात यांचे शिक्षण परदेशात झाले असून सध्या ते पुण्यात त्यांचा व्यावसाय सांभाळत आहेत. या लग्नासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जातंय.

COMMENTS