त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने घेतला ‘ठाकरे’ चित्रपटावर आक्षेप !

त्यामुळे सेन्सॉर बोर्डाने घेतला ‘ठाकरे’ चित्रपटावर आक्षेप !

मुंबईशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित सिनेमाच्या ट्रेलरवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शीत करण्यात येणार होता. परंतु या चित्रपटातील बाळासाहेबांची भाषणं काढून टाकण्यात यावी असं सेन्सॉर बोर्डानं म्हटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय कारकीर्द सर्वाधिक वादग्रस्त ठरली होती. बाळासाहेबांच्या सर्वच भाषणांवर आक्षेप घेतला जात होता. त्यामुळे ही भाषणं सिनेमातून काढून टाका असं सेन्सॉर बोर्डाने म्हटलं आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शीत करण्यात येणार होता. परंतु सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपामुळे याचं प्रदर्शन लांबवणीवर जाणार असल्याचं दिसत आहे. परंतु काहीही झालं तरी  ट्रेलर आजच प्रदर्शित करणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मार्च 2018पासून सिनेमाचं शूटिंग सुरू असून 23 जानेवारी 2019ला बाळासाहेबांच्या जन्मदिनी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार असून या सिनेमाची निर्मिती शिवसेना नेते संजय राऊत करत आहेत, तर दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे करत आहेत.

COMMENTS