नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी 2019 मधील लोकसभा निवडणुकीत आपण स्वतंत्र लढणार असल्याचे बादल यांनी जाहीर केलं आहे. तसेच आम्ही पंजाबमध्ये जे वचन दिले होते ते पूर्ण केले, आता हरियाणातील लोकांच्या कल्याणासाठी काम करणार असल्याचे बादल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच नवीन इतिहास घडविण्यासाठी सर्वांनी अकाली दलाच्या झेंड्याखाली एकत्र यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच राज्यात आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीजपुरवठा देणार असल्याचेही बादल यांनी म्हटले. अकाली दलाने यापूर्वी भाजपसोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या.परंतु हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकांमध्येही दोन्ही पक्षांना अपयश आलं होतं.
COMMENTS