जीवन कसे आणि का जगावे याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

जीवन कसे आणि का जगावे याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये अटल बिहारी वाजपेयी यांना सर्वपक्षीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा दिला. अटलजी हे देशासाठी आणि देशवासियांसाठी जगले. त्यांचे संपूर्ण आयुष्य मार्गदर्शकाचे होते, जीवन कसे, का जगावे आणि कशासाठी जगावं याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे अटलजी होते.असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दीर्घ काळ विरोधात राहूनही त्यांनी विचारधारेला तडा जाऊ दिला नाही. संसदीय परंपरेचा गौरवगान करताना ते जनसामान्यांचा आवाज म्हणून जगले. जेव्हा संधी मिळाली तेव्हा सर्वसामान्यांसाठी त्याचा उपयोग केला. ते नावानेच अटल नव्हते तर त्यांच्या वर्तणुकीत, त्यांच्या कणाकणात अटलभाव दिसून येतो असंही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पोखरणमधील अणुचाचणी संपूर्ण जगाला धक्का देणारी होती. दशकांपासून त्याची तयारी सुरू होती. पण त्याची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती. ११ मे ला पहिली अणूचाचणी झाल्यानंतर जगभरातून दबाव निर्माण झाला. त्याला न जुमानता त्यांनी पुन्हा १३ मे रोजी दुसरी अणुचाचणी करत जगाला उत्तर दिले असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS