कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा, 200 रुपयांचं अनुदान जाहीर !

कांदा उत्पादक शेतक-यांना दिलासा, 200 रुपयांचं अनुदान जाहीर !

मुंबई – राज्यातील कांदा उत्पादकांना सरकारने दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने 150 कोटी रुपयांची तरतूद केली असून या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान एकूण 75 लाख टन कांद्यासाठी देण्यात येणार आहे. यामध्ये 18 नोव्हेंबरपर्यंतच्या 41. 23 लाख टन आणि 25 डिसेंबर पर्यंतच्या 33. 73 लाख टन कांद्याचा समावेश आहे.

सध्या देशभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा गाजत असून कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे. कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षा निम्म्याने पडले असल्यामुळे सरकारनं दिलासा द्यावा अशी मागणी शेतक-यांकडून केली जात आहे.

दरम्यान सरकारनं जाहीर केलेल्या या अनुदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. 200 रुपयांचे अनुदान पुरेसे नसून या अनुदानात वाढ करण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

 

COMMENTS