पंतप्रधान मोदींना देशाचा इतिहास माहीत नाहीच परंतु त्याबाबत त्यांना आदरही नाही – सचिन सावंत

पंतप्रधान मोदींना देशाचा इतिहास माहीत नाहीच परंतु त्याबाबत त्यांना आदरही नाही – सचिन सावंत

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसचे नेते सचिन सावतं यांनी जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी बोलत असताना मोदी यांनी लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म पुण्यात झाला असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरुन आता सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान इतिहास विसरणारे कधीच भविष्य निर्माण करु शकत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा इतिहास माहीत नाहीच परंतु त्याबाबत त्यांना आदरही नाही. लोकमान्य टिळक व गोपाळ कृष्ण गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला असताना, पुणे ही त्यांची जन्मभूमी आहे असा जावईशोध मोदींनी लावला आहे. त्यामुळे त्यांचा जाहीर निषेध करत असल्याचं ट्वीट सावंत यांनी केलं आहे.

COMMENTS