अखेर ईव्हीएमनेच 2019 मधील लोकसभा निवडणूक होणार !

अखेर ईव्हीएमनेच 2019 मधील लोकसभा निवडणूक होणार !

दिल्ली – काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेतली. आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा अशी मागणी केली. मात्र आता निवडणुकीसाठी खूप कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे आता मतपत्रिका वापरणे शक्य नसल्याचं निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे जर मतपत्रिका वापरणं एवढ्या कमी वेळेत शक्य नसेल तर 50 टक्के ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅटची मोजणी करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लीकार्जुन खरगे यांनी केली आहे. याचा अर्थ आता मतपत्रिका नाही तर ईव्हीएमनेच 2019 मधील लोकसभा निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी ईव्हीएमला विरोध केला आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनंही ईव्हीएमला विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी एका सायबर एक्सपर्टने लंडनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे ईव्हीएमबाबत अधिकच संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन त्यांना ईव्हीएमबाबत भीती सांगितली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनीही या बैठकीनंतर अशीच मागणी केली आहे.

 

COMMENTS