उस्मानाबाद – दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरुन शेतक-यांचा रास्तारोको ! VIDEO

उस्मानाबाद – दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरुन शेतक-यांचा रास्तारोको ! VIDEO

उस्मानाबाद – मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा शेतक-यांना बसत आहेत. यावर्षी पाऊस खुपच कमी झाल्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे उस्मानाबादमधील शेतक-यांनी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरुन रास्तारोको केला आहे. नायगाव (ता कळंब) येथील शेतकऱ्यांनी रास्तारोको केला असून अनेक मागण्या या शेतक-यांनी सरकारकडे केल्या आहेत.

शेतक-यांच्या मागण्या

1) शेतक-यांचं संपूर्ण कर्ज माफ करा

(2)संपूर्ण लाईट बिल माफ करा

(3)पिकाचे त्वरीत पंचनामे करुन हेक्टरी 50,000 हाजार रुपये द्यावे

(4)शेतक-यांना पीकविमा मंजुर करा

(5)ऊस शेतीसाठी हेक्टरी 100,000 लाखाप्रमाणे मदत जाहीर करावी

(6)शासनाने जाहीर केलेली 50%आणेवारी चुकीची असुन ती दुरुस्त करावी अशी मागणी या शेतक-यांनी केली आहे.

COMMENTS