उस्मानाबाद –  लोकसभेसाठी शिवसेना नवीन उमेदवाराच्या शोधात, “यांना” मिळू शकते संधी ?

उस्मानाबाद –  लोकसभेसाठी शिवसेना नवीन उमेदवाराच्या शोधात, “यांना” मिळू शकते संधी ?

उस्मानाबाद – विद्यामान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची कामगिरी निराजनक असल्याने त्यांच्या तिकीटाचे दोर कापले जाणाऱ असल्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी एखादा नवखा उमेदवार दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पक्षात उमेदवारीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. राजकीय शह-कटशहात कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.

१९९५ पासून जिल्ह्यात शिवसेनेची पाळे-मुळे रुजायला सुरूवात झाली. जुना कळंब विधानसभा मतदारसंघ असो की परंडा, उमरगा विधानसभा मतदारसंघ या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेने आपले वर्चस्व प्रस्तापित केले. शिवाय लोकसभेतही शिवाजी कांबळे, कल्पनाताई नरहिरे, प्रा. रवींद्र गायकवाड यांच्या रुपाने खासदार पाठविले. विद्यमान खासदार प्रा. गायकवाड यांना शिवसेनेने दोन वेळा आमदारकी, खासदारकी तसेच जिल्हाप्रमुख अशी विविध जबादाऱ्या दिल्या. पण, खासदार प्रा. गायकवाड यांची गेल्या साडेचार वर्षातील खासदारकीची कामगिरी निराजनक राहिली आहे.

या मतदारसंघातील जनतेने तब्बल अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडूण दिले. राज्याच्या राजकारणात मात्तबर असलेल्या डॅ. पद्मसिंह पाटील यांना जनतेने चितपट करून खासदारकी प्रा. गायकवाड यांना बहाल केली. पण, गेल्या साडेचार वर्षात बोटावर मोजता येतील एवढ्याच गावात प्रा. गायकवाड फिरकले. कागदोपत्री पत्रकबाजी करण्यातच त्यांनी धन्यता मानली. ना जिल्ह्यात रोजगार निर्मितीचं एखादं युनीट आले ना तसा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.

भाषणबाजी हे एकमेव भांडवल असलेल्या प्रा. गायकवाड यांचे गेल्या चार महिन्यापासून जिल्ह्यात दौरे सुरू केल आहेत. रेल्वेमार्गाला गती मिळाल्याचे पोस्टर सहा महिन्यापूर्वी पाहायला मिळाले. पण, तोही फुसका बार असल्याचे सध्याचे चित्र आहे. गेल्या साडेचार वर्षात जिल्ह्यातील अनेक शिवसैनिक त्यांच्या उमरगा येथील बंगल्यावर कामाच्या निमित्ताने येत होते. पण, साहेब दिल्लीला आहेत, असा सांगावा मिळत असल्याने शिवसैनिक माघारी हाताने परतत होते. दुसरीकडे प्रा. गायकवाड मात्र बंगल्यात (स्वतःच्याच विश्वास) विश्रांती घेणे पसंत करायचे. असे अनुभव अनेक शिवसैनिक दबक्या सांगतात. त्यामुळे जिल्ह्यातील जनता तर सोडाच अनेक शिवसैनिकही त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे.

शिवाय खासदारफंड वाटप करतानाही टक्का चांगलाच घसरल्याची चर्चा सेनेच्या कार्यकर्त्यांत होत आहे. त्यामुळे शिवसैनिकांपेक्षा इतर पक्षातील नेत्यांनाच खासदार निधीची कामे गेली. याच कारणावरून त्यांच्या मुलाला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत निवडूण आणता आले नाही. हा परभावही त्यांना पचविता आला नाही. संपूर्ण जिल्हा परिषदच विरोधकांच्या ताब्यात दिल्याचा अहवाल मातोश्रीवर गेल्याचे बोलले जात आहे.

विमानातील त्यांचा प्रतापही संपूर्ण देशाने पाहिला आहे. त्याच वेळी पक्षप्रमुखांनी त्यांना समज दिली होती. दरम्यान राजकीय पातळीवर विविध पदे देऊन पक्षाला त्यांनी काहीच दिले नसल्याने आता पक्षा संघटनेतील जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाणार आहे. त्यांच्याऐवजी मुलाला राजकारणात तयार करावे, असा सल्ला मातोश्रीवर आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विद्यामान खासदाराच्याऐवजी शिवसेना नवख्या उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा आहे.

यामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे नाव आघाडीवर आहे. खासदारकी त्याच्याकडे गेली तर विधानसभेला उमेदावर कोण, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच वेळी उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांचही नाव खासदारकीच्या आखाड्यात घेतले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील राष्ट्रवादीला (पाटील कंपनीला) टक्कर देण्यासाठी उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर उमेदवार योग्य राहतील अशीही चर्चा राजकीय गोटात चर्चीली जात आहे. तर  गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेले सहसमपार्क प्रमुख अनिल खोचरे यांनाही लॉटरी लागण्याची श्यक्यता वर्तविली जात आहे. ऐनवेळी पक्षाने आदेश दिला तर उपनेते आमदार प्रा. तानाजी सावंत यांनाही जागा लढवावी लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.  त्यामुळे सेनेचा नवखा उमेदवार कोण, याबाबत शिवसैनिकांना उत्सुकता लागली आहे.

COMMENTS