कळंब तालुक्यातील गौर ग्रामपंचायतीची निवडणूक 16 ऑक्टोबरला झाली होती. प्रभाग क्रमांक तीनमधील एका जागेवर मतदान यंत्रात गडबड झाली. 17 आक्टोबरला मतमोजणी झाल्यानंतर उमेदवारापेक्षा नोटाला जास्तीची मते मिळाल्याने मतमोजणी प्रतिनीधीसह गावकऱ्यांनी याबाबत आक्षेप घेतला. त्यानंतर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी केली. मदतान यंत्रावर लावण्यात आलेली मतपत्रिक तिरपी बसल्याने असा प्रकार झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सात कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले होते. दरम्यान नागरिकांच्या मागस प्रवर्ग (स्त्री) या एका जागेसाठी 27 आक्टोबरला मतदान घेण्याचे आदेश निवडणूक विभागाने दिले आहेत. तसेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 28 आक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Newer Post
नवज्योतसिंग सिद्धू , काँग्रेस नेते
COMMENTS