उस्मानाबाद विधानसभा मतदरासंघाला संपूर्ण कळंब तालुका जोडला गेलेला आहे. उस्मानाबाद तालुक्याचा अगदीच थोडका भाग या विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे कायमच कळंब तालुका या मतदारसंघाच्या केंद्रस्थानी असतो. उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात जेंव्हा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा एकास एक सामना होतो तेंव्हा शिवसेनेचा उमेदवार जिंकतो. मात्र विरोधकांचे तगडे दोन उमेदवार असतील तर विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट होते त्यामध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार बाजी मारतो असा आजपर्य़ंतचा अनुभव आहे. आता 2019 च्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांच्या मतांध्ये फूट पडू शकते. हे गृहीत धरुणचं शिवसेनेनं मतदारसंघात मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे.
या तयारीचा भाग म्हणून शिवसेनेनं कळंब तालुकाप्रमुख म्हणून शिवाजी कापसे यांची निवड केली आहे. तालुक्याला शिवसेनेकडे दमदार नेता नव्हता. त्यातच गटबाजीमुळे मरगळ आली होती. कापसे यांच्या निवडीने ही मरगळ दूर होऊन शिवसैनिक कामाला लागतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाजी कापसे यांचा कळंब शहर आणि कळंब शेजारील गावांवर ब-यापैकी प्रभाव आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो. कापसे यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे. तालुक्यातील डिकसळ, चौसाळा, कोथळा, मस्सा आदी गावात कापसे यांचा करिष्मा दिसून आला आहे. त्यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन काम सुरू केले आहे. तर डिकसळ मतदारसंघात खुल्या जागेवर मुस्लिम उमेदवाराला संधी देत मुस्लिम विरोधी नसल्याचे दाखवून दिले आहे.
शिवाजी कापसे यांनी त्यांना कळंब नगरपालिकेपुरते मर्यादीत केले आहे. सध्यातरी त्यांच्या कळंब नगरपालिकेपलिकडे राजकीय महत्वकांक्षा नाही. त्यामुळे शिवसेनेते राजकीय स्पर्धा होण्याची शक्यता नाही. मात्र जुने जाणते निष्ठावंत शिवसैनिक कापसे यांच्या निवडीकडे कसे पाहतात यावरही ब-याच गोष्टी अवलंबून आहेत.
COMMENTS