पिंपरी-चिंचवड – भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड – भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड –  भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी तक्रार दाखल केली होती. तुषार कामठे यांनी निवडणुकीमध्ये खोटी शैक्षणिक माहिती दिल्या प्रकरणी सचिन साठे यांनी तक्रार दाखल केली असून कामठे यांच्यावर सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

साठे यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे की, पिंपळे निलख या प्रभागात मागास प्रवर्गातून 26 (ब) या उमेदवारीसाठी सचिन साठे यांनी अर्ज भरला होता. त्याच जागेसाठी तुषार कामठे यांनीही अर्ज भरला. यावेळी कामठे यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र कामठे यांच्या शैक्षणिक पात्रतेची शंका आल्याने साठे यांनी चौकशी केली असता कामठे यांनी 1998-99 साठी डेक्कन येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉमर्स महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला.  मात्र ते नापास झाले.  मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयाने  त्यांना नापास असा शेराही दिला. मात्र त्याच वर्षी 1999 साली सांगवी येथील बाबूराव घोलप या महाविद्यालयात अकरावी पास असल्याचा मार्च 1999 चा दाखला दिला व बारावीमध्ये प्रवेश घेतला अशी माहिती पुढे आली.

मात्र मी स्वतः मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयात जाऊन चौकशी केली असता  कामठे हे नापास आहेत हे स्पष्ट झाले व त्यांना पास असा खोटा शेरा देणारे  १९९९ साली महाविद्यालयात कोणीही गायकवाड किंवा पाठक नामक लिपीक कार्यरत नव्हते हे समोर आले आहे.

त्यामुळे खोट्या कागदपत्रे निवडणुकीत सादर करत नागरिकांची फसवणूक केली. असा आरोप करीत साठे यांनी कामठे यांच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

COMMENTS