केरळ – केरळमध्ये सीपीएमनं लावलेल्या पोस्टरमुळे चांगलीच दहशत पसरली असल्याचं दिसत आहे.या पोस्टरवर चक्क एका विदेशातील हुकूमशहाचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे सध्या या पोस्टरवरुन देशभरात चर्चेला उधाण आलं आहे. सीपीएमनं लावलेल्या या पोस्टवर चक्क हुकूमशहा किम जोंग-उन यांचा फोटो लावण्यात आला आहे. डाव्या पार्टीनं लावलेल्या या फोटोमुळे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असून सीपीएम सध्या आरएसएस आणि भाजपच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र तर टाकण्याच्या तयारीत नाही ना? असं ते म्हणाले आहेत.
सीपीएमच्या पोस्टरवर, डाव्या विंगापुढे किम जोंग यांना सलाम करतानाचा फोटो लावला आहे. किम जोंग हे उत्तर कोरियाचे नेते असून हुकूमशहा अशी त्यांची ओळख आहे. त्यांच्या या लावलेल्या फोटोमुळे केरळमध्ये सध्या दहशतीचं वातावरण आहे.
केरळमधील भाजप-आरएसएस आणि माकपच्या कार्यकर्त्यांमध्ये रक्तपात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि आरएसएस कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यांच्या विरोधात, भाजपने 3 ऑक्टोबर रोजी जनधन यात्रा देखील काढण्यात आली होती.
CPI (M) poster with North Korean leader Kim Jong-un's picture seen in Kerala's Nedumkandam pic.twitter.com/W26vQTE7d1
— ANI (@ANI) December 17, 2017
COMMENTS