“गांधी आडनावामुळेच मी खासदार झालो!”

“गांधी आडनावामुळेच मी खासदार झालो!”

हैदराबाद – राजकारणात आडनाव आणि गॉडफादरशिवाय पर्याय नसल्याचं वक्तव्य भाजपच्या एका खासदारानं केलं आहे. तुम्हाला जर वजनदार आडनाव आणि कोणी गॉडफादर नसेल तर राजकारणात येणं अवघड आहे असं वक्तव्य भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी केलं आहे. तसेच मी गांधी आडनावामुळेच कमी वयात दोन वेळा खासदार झालो असंही ते म्हणाले. हैदराबादमधील एका कार्यशाळेत विद्यार्थ्यांसमोर बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

माझ्या नावापुढे गांधी आडनाव नसतं तर मी दोन वेळा खासदार झालो नसतो आणि माझे चार शब्द ऐकण्यासाठी तुम्ही समोर बसले नसतात असंही वरुण गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच देशातील अनेक तरुणांना राजकारणात यायचं आहे परंतु त्यांना कोणी गॉडफादर नसल्यामुळे त्यांना राजकारणापासून वंचित राहावे लागत असल्याचंही गांधी म्हणाले.

COMMENTS