आमचा वाईट काळ सुरू असतानाही नांदगावकर आमच्यासोबत – पंकज भुजबळ

आमचा वाईट काळ सुरू असतानाही नांदगावकर आमच्यासोबत – पंकज भुजबळ

नांदगाव  : “शासन आपल्या दारी” या माध्यमातून नागरिकांचे कामे एकाच छताखाली व्हावी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून ‘ महाराजस्व अभियान ‘ हा उपक्रम शासनाने हाती घेतला आहे या अभियानाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार पंकज भुजबळ यांनी केले. महाराष्ट्र शासनाचा महसूल विभाग व छ्त्रपती शिवाजी महाराज जनसेवा मित्र मंडळ, नांदगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नियोजित सावता महाराज मंदीर जागेत काल ‘ ‘महाराजस्व अभियाना’ चे उदघाटन करण्यात आले त्यावेळी श्री.भुजबळ बोलत होते.

व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, तहसीलदार चंद्रकांत देवगुणे , नगराध्यक्ष राजेश कवडे, सभापती सुमनताई निकम, जि. प.सदस्या आशाताई जगताप , उपसभापती सुभाष कुटे, गटविकास अधिकारी जे.टी. सूर्यवंशी, मुख्याधिकारी व्ही.बी.दातीर, तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर, तालुका आरोग्य अधिकारी अशोक ससाणे,शिवसेना तालुकाप्रमुख राजाभाऊ जगताप, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड आदी उपस्थित होते..

ते पुढे म्हणाले की, गोरगरिबांना विविध शासकीय योजनांच्या तांत्रिक अडचणी माहित नसतात त्यामुळे शासकीय कार्यालयात चकरा मारूनही त्यांचे कामे होत नाही..या अभियांनाद्वारे सर्व कामे एकाच ठिकाणी होणार असल्याने गोरगरिबांना त्याचा दिलासा मिळणार आहे.तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी या अभियानासाठी केलेल्या प्रयत्नांचे श्री.भुजबळ यांनी विशेष कौतुक केले..दरम्यान, नांदगावकर जनतेचे आभार मानतांना श्री.भुजबळ म्हणाले की, नांदगावातील माणसं चांगली आहेत. आमचा काळ वाईट सुरु असतांनाही सर्व माझ्यासोबत आहेत.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ व मंडळाचे संस्थापक नगराध्यक्ष राजेश कवडे यांचे ‘ महाराजस्व अभियान ‘ राबविल्याबद्दल विशेष कौतुक केले..तसेच जनतेला आवाहन करतांना ते म्हणाले की, शासकीय विविध दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे जमविण्यासाठी आपले कार्यालय सदैव खुले असून त्यासाठीची मदत करून दाखले पूर्ण करण्यासाठी आम्ही मदत करू असे आश्वासन श्री.कांदे यांनी यावेळी दिले..

प्रांताधिकारी भीमराज दराडे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले कि, अनेक शासकीय योजना असतात मात्र शासकीय अधिकारी व नागरिक यांच्यात समन्वय साधला जात नसल्याने या योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे नुकसान होते..जनतेची कामे करा कामात हलगर्जीपणा करू नका अशा कानपिचक्या उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या..पंचायत समितीचे उपसभापती सुभाष कुटे व भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले..

तहसीलदार चंद्रकांत देवगुणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विविध शासकीय योजना व त्यासंबंधी लागणारे कागदपत्रे याची परिपुर्ण माहिती यावेळी दिली..यावेळी नगरपरिषदेच्या वतीने ‘दीनदयाळ उपाध्याय’ योजने अंतर्गत बचतगटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले..कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सचिन साळवे यांनी तर आभार अशोक कुळधर यांनी मानले..

COMMENTS