पुणे – औरंगाबादमध्ये जागा असताना मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने मराठवाड्याचे हक्काचे ‘आय आय एम’ नागपूरला पळवले आता जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्यांनी अशी एखादी संस्था मराठवाड्यात आणून दाखवावी तेव्हाच मराठवाड्याच्या विकासासाठी पंकजा आणि मी दोघे मिळून कोणाशीही भांडण्यास तयार असल्याचे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आहे. पुण्यामध्ये मराठवाडा प्रोफेशनल क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या चहा पार्टी व थेट संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
मुंडे भाऊ- बहिणीचा वाद उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. पण आता धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे सोबत एकत्र येण्याची तयारी दर्शवली आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा बद्दल बोलत असताना धनंजय मुंडे म्हणाली की, मुंडे साहेबांच्या संघर्षाचा वारसा अगदी ऊसतोडणी कामगारांसहित दुसरीकडे गेला आहे. ज्यांना उसतोडणी कामगारांबद्दल काहीच माहीत नाही ते उसतोडणी लवाद चे अध्यक्ष होऊन बसलेत. असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांना टोला लगावला.
मी त्यांच्याबरोबर कोणत्याही मंचावर एकत्र येण्यास तयार आहे पण त्यांनी आयआयएम मराठवाड्यात आणावे, मराठवाड्याचे हक्काचे पाणी द्यावे, आणि ऊस तोड कामगारांचे प्रश्न मार्गी लावावेत, असेही ते एका प्रशाला उत्तर देताना म्हणाले.
COMMENTS