नांदेड – नांदेड जिल्ह्यातील माळेगाव इथल्या खंडोबाच्या यात्रेत आयोजित केलेल्या धनगर आरक्षण जागर परिषदेला आज महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत असताना पंकजा मुंडे यांनी धनगर समाजाला आरक्षण देण्याचं वचन दिलं आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळेपर्यंत परत मंत्रालयात आम्ही प्रवेश करु शकणार नाही,” असं जाहीर वचन पंकजा मुंडे यांनी दिलं आहे. या परिषदेला रासपचे प्रमुख महादेव जानकरही उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना “मी पंकजा गोपीनाथ मुंडेंची कन्या, पंकजा मुंडे, आजच्या सभेत तुम्हाला जाहीर वचन देते की, धनगर समाजाच्या विश्वासाच्या जीवावर परत सत्तापरिवर्तन न करता, सत्तेमध्ये भारतीय जनता पक्षाला आणायचं आहे,” असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. पण धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय परत मंत्रालयात प्रवेश करु शकणार नाही, याचा विश्वास असल्याचंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
तसेच धनगर आरक्षणासाठी दिल्लीतच नव्हे तर पृथ्वीच्या बाहेर जाण्याची, तुमच्यासोबत मेंढरामागे येण्याची तयारी असून धनगर आरक्षणात कोणी आडकाठी आणली तर काठी उगारायलाही मागे-पुढे बघणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS