रायबरेलीतून सोनिया गांधींऐवजी प्रियंका गांधी लढवणार निवडणूक ?

रायबरेलीतून सोनिया गांधींऐवजी प्रियंका गांधी लढवणार निवडणूक ?

नवी दिल्ली –  सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून प्रियंका गांधी-वढेरा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. त्यामुळे तेथील तयारी आणि संघटनेतील फेरबदलासाठी प्रियंका यांचा सल्ला घेतला जाणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी प्रियंका पडद्यामागे खूप सक्रीय होत्या. निवडणुकीनंतर पुन्हा त्या राजकारणापासून दूर झाल्या होत्या. परंतु आता तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रियंका पुन्हा एकदा कार्यरत झाल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रियंका यांच्या मंजुरीनंतर ८ ब्लॉक अध्यक्ष बदलण्यात आले होते. त्यामुळे काँग्रेस अडचणीच्या काळात प्रियंका यांना केवळ निवडणुकीत उभा करणे नव्हे तर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीयही करू शकते असं बोललं डात आहे. त्याचबरोबर मागील निवडणुकीनंतर सोनिया गांधी या मतदारसंघात जास्त फिरकल्या नाहीत. त्यामुळे रायबरेलीतून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS