अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, पंकजा मुंडेंची घोषणा !

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ, पंकजा मुंडेंची घोषणा !

मुंबई – अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढक करण्यात आली असून याबाबतची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. पंकजा मुंडे यांनी विधीमंडळात ही घोषणा केली असून अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ करण्यात आली आहे. तसेच  अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 60वरून 65 करण्यात आलं असल्याचंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. परंतु वाढीव निवृत्तीचा फायदा घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार असल्याची अट समोर ठेवण्यात आली आहे.

दरम्यान अंगणवाडी सेविकांना यापुढे संप करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं असून त्यांच्यावर मेस्मा लावण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान मेस्मा लावण्याबाबत विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. अंगणवाडी सेविकांचं आंदोलन दाबण्यासाठी त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येत असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. मात्र मेस्मा लावण्याचा निर्णय हा अन्यायकारक नाही. कुपोषित बाळाला दोन ते तीन दिवस पोषण आहार भेटला नाही, तर मृत्यूचं संकट ओढावतं. त्यामुळे या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं.

 

 

COMMENTS