चुकीच्या कामापेक्षा गरिबांसाठी खर्च करणं कधीही चांगलं, पंकजा मुडेंचं धनंजय मुंडेंना उत्तर !

चुकीच्या कामापेक्षा गरिबांसाठी खर्च करणं कधीही चांगलं, पंकजा मुडेंचं धनंजय मुंडेंना उत्तर !

बीड – शिर्डी येथे येत्या 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आवास योजनेच्या ई-गृहप्रवेशचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना हक्काचं घर दिलं जाणार आहे. पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यामार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील लाभार्थ्यांना मोफत बससेवा दिली जाणार आहे. यासाठी सरकारकडून 2 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यावरुन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या या टीकेला अखेर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं आहे.

खर्च नेमका कशावर करायचा ? करमणुकीच्या कार्यक्रमावर करायचा की ? पिढ्यांना वाया घालवण्यासाठी करायचा? चुकीच्या प्रथा राबवण्यासाठी करायचा का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच चांगल्या कामासाठी खर्च होत असेल तर त्यात वावगं काय ? तसेच चुकीच्या कामापेक्षा गरीबांसाठी खर्च करणं कधीही चांगलं आहे. असा टोला पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना नाव न घेता लगावला आहे.

धनंजय मुंडे यांनी गणेशोत्सवात परळीमध्ये सास्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. तसेच या कार्यक्रमात डान्सर सपना चौधरीला निमंत्रित केलं होतं. यावरुन अशा कार्यक्रमात नृत्याची गरज काय असा सवालही पंकजा मुंडे यांनी केला आहे.

COMMENTS