मुंबई – यापुढे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे बदल्यांमध्ये पारदर्शकता राहणार आहे. यापूर्वी मॅन्यूअली बदल्या होत होत्या त्यामुळे त्यात वरदहस्त असेल त्यांनाच फायदा व्हायचा. परंतु आता ऑनलाईन पद्धतीमुळे यावर आळा बसणार आहे.
दरम्यान मॅन्यूअली बदल्यांमुळे जे शिक्षक १५-१५ वर्ष दुर्गम भागात सेवा बजावत आहेत. त्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच अपंग, गंभीर आजार असलेले, पती, पत्नी एकत्रिकरणासाठीही याचा फायदा होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांना फायदा होणार आहे.
COMMENTS