बीड, परळी – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास विभागाच्या २५१५ निधीतून परळी मतदारसंघातील १४४ गावांमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. बीड जिल्हा परिषदेने नुकतीच या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून लवकरच सभागृहाच्या बांधकामाला सुरवात होणार आहे.
ग्रामीण भागातील जनतेची गरज ओळखून पंकजा मुंडे यांनी प्रत्येक गावांत सामाजिक सभागृह बांधण्याचा शब्द दिला होता, या शब्दांची पूर्ती करण्यासाठी त्यांनी मतदारसंघातील १४४ गावांना ग्रामविकास विभागाच्या मूलभूत विकास योजना २५१५ मधून १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
परळी तालुक्यातील ८६ गावांना ९ कोटी २० लाख तर मतदारसंघात येणा-या अंबाजोगाई तालुक्यातील ५८ गावांना ५ कोटी ८० लाख असा एकूण पंधरा कोटी रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने या निधीला नुकतीच प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. वरील सर्व गावांमध्ये या निधीतून सुसज्ज असे सामाजिक सभागृह लवकरच उभारण्यात येणार आहे.
भेदभाव न करता समतोल विकासाचे धोरण
पक्षीय भेदभाव न करता मतदारसंघातील प्रत्येक गांवचा समतोल विकास करण्याचे पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांचे धोरण आहे, त्यामुळेच त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रूपयांचा निधी गावांना मंजूर केला, म्हणूनच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गांवोगांवी अनेक कामे सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागात सामाजिक सभागृहाची गरज होती आणि हीच गरज ओळखून त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मतदारसंघातील जनतेने त्यांचे आभार मानले आहेत.
COMMENTS