उस्मानाबाद – जलसंधारणमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातून मत अजमावत आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांचे आव्हान असणार आहे. दरम्यान शिवसेनेचे भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी बुधवारी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तेही या मतदारसंघातून मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे कांबळे यांची उमेदवारी सावंत यांना डोकेदुखी ठरु शकते.
दरम्यान गेली अनेक दिवस कांबळे हे तालुकाप्रमुख म्हणून काम करीत आहेत. मात्र सातत्याने होत असलेल्या अन्यायामुळे त्यांनी अखेर पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय वारंवार आपल्याला संधी नाकारली जात असल्याचे कारण पुढे करत मैदानात उतरण्याचायं निश्चित त्यांनी केले आहे. त्यामुळे जलसंधारण मंत्र्यांना स्वपक्षातूनच नाराजीचा मोठा सूर उमटू लागला असून त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
COMMENTS