महायुतीतील रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर!

महायुतीतील रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर!

मुंबई – महायुतीतील रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपनं आरपीआयला सहा जागा सोडल्या आहेत. या जागांवरील उमेदवार आज रिपब्लिकन पक्षाने जाहीर केल्या आहेत. या उमेदवारांची नावे अधिकृतरित्या आज दि. 3 ऑक्टोबर 2019 रोजी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर केले आहेत.

रिपाइंचे अधिकृत उमेदवार

माळशिरस – डॉ विवेक गुजर
फलटण – दिगंबर आगाव
पाथरी – आ. मोहन फड
नायगाव – राजेश पवार
भंडारा – अरविंद भालाधरे
मानखुर्द शिवाजीनगर – गौतम सोनवणे

माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर आठवले यांनी सोडला होता. त्यांनी माळशिरसमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी. तसे होणार नसेल तर माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी,” अशी मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर आज अखेर माळशिरसमधून डॉ विवेक गुजर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

COMMENTS