नवी दिल्ली – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला ‘परीक्षा पर चर्चा’ हा कार्यक्रम देशातील किती शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी पाहिला आहे’?, याची माहिती गोळा करण्याचे व त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशभरातील शाळांना दिले असल्याची बातमी टाईम्स ऑफ इंडियाने छापली आहे. या आदेशानंतर राज्य सरकारने सर्व शाळांना विद्यार्थ्यांची माहिती आणि फोटो किंवा व्हिडिओ जमा करण्यास सांगितले असून याबाबतचं पत्रक मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत देशातील सर्व जिल्हा मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांना एक फॉर्म दिला असून यात शाळांची एकूण संख्या, सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या, किती विद्यार्थ्यांनी ‘परीक्षा पर चर्चा’ हा कार्यक्रम पाहिला किंवा ऐकला याची संख्या, टीव्हीवर पाहणाऱ्यांची संख्या, तसेच रेडिओ, एमएचआरडी, दूरदर्शन, इंटरनेट, चॅनेल्स व वेब स्ट्रिमिंगवर पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, याची माहिती भरण्यास सांगितली असल्याची माहिती आहे. परंतु मनुष्यबळ विकास मंत्रालयानं मात्र हे वृत्त फेटाळलं असून ‘आम्ही अशी कोणतीही माहिती मागितली नसल्याचं म्हटलं आहे.
COMMENTS