अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार लोकसभेच्या मैदानात, मावळमधून लढवणार निवडणूक ?

अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार लोकसभेच्या मैदानात, मावळमधून लढवणार निवडणूक ?

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदसंघातून उमेदवारी देण्यात आली असून याबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यापूर्वीही पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत शरद पवार अनुकूल नसल्याचे पहावयास मिळाले होते. पवार घराण्यातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर पक्षबांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याना संधी कधी मिळणार? असा सवाल त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना विचारला होता. परंतु आता पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान पार्थ पवार हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होत असतात. पार्थ पवार हे मागील निवडणुकीतच सक्रीय सहभागीही झाले होते. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांचे पक्षाच्या पोस्टवर फोटो देखील झळकल्याचं पहावयास मिळाले आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरतील असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS