मावळमधील ‘त्या’ पहिल्या भाषणावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया!

मावळमधील ‘त्या’ पहिल्या भाषणावर पार्थ पवारांची प्रतिक्रिया!

पुणे – राष्ट्रवादीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांच्या पहिल्या भाषणाची अनेरांनी खिल्ली उडवली. परंतु आपण पहिल्या भाषणात का अडखळलो याबाबत पार्थ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मावळमध्ये माझं ते पहिलंच भाषण होतं. त्यापूर्वी एवढ्या मोठ्या जनसमुदायासमोर मी कधीही बोललो नव्हतो. त्या भाषणाला सात ते आठ हजार लोक उपस्थित होते. शिवाय दादा (अजित पवार), साहेब (शरद पवार) यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते मंचावर होते. त्यामुळे बोलताना काही शब्द मी गिळले. विरोधकांनी त्याचाच व्हिडिओ तयार केला आणि मला ट्रोल केलं. असं पार्थ यांनी म्हटलं आहे.

मी बोलताना काही चुका केल्या हे मान्य आहे, पण पहिलंच भाषण असल्याने मी अडखळलो होतो आणि काहीसा घाबरलो होतो त्यात फारसं काही वावगं नाही. मात्र विरोधकांनी चुकांचा व्हिडिओ तयार करून मला ट्रोल केलं असं पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS