लालूप्रसाद यादव यांनी बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना करू नये, रामविलास पासवान यांनी लालूंना सुनावले !

लालूप्रसाद यादव यांनी बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना करू नये, रामविलास पासवान यांनी लालूंना सुनावले !

नवी दिल्ली – चारा घोटाळ्यात न्यायालयानं दोषी ठरवल्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी स्वतःची तुलना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला यांच्याशी केली होती. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लालू प्रसाद यादव यांना चांगलेच सुनावले आहे. लालू प्रसाद यादव यांनी स्वतःची तुलना बाबासाहेब आंबेडकरांशी करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान प्रचंड मोठे आहे. तुम्ही चारा घोटाळाप्रकरणात दोषी ठरलेले आहात. भ्रष्टाचाराबाबत तुम्हाला शिक्षा सुनावली जाणार आहे हे विसरू नका, असे खडे बोल रामविलास पासवान यांनी लालू प्रसाद यादव यांना सुनावले आहेत.

तसेच स्वतःची तुलना आंबेडकरांशी करून लालूप्रसाद यादव यांनी आंबेडकरांचा अपमान केला असल्याचा आरोपही पासवान यांनी केला आहे. रेल्वेमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव देशभरात प्रसिद्ध होते. मात्र यूपीएसोबत त्यांच्या पक्षाची युती ही फक्त भ्रष्टाचारासाठी होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पैशांशिवाय कशाला महत्त्व दिले? असाही प्रश्न पासवान यांनी त्यावेळी उपस्थित केला.

 

COMMENTS