“शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी”

“शरद पवार आम्हाला बाळासाहेबांच्या जागी”

पुणे – माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी जोरदार बॅटिंग केली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आम्हाला बाळासाहेबांच्या जागी आहेत या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शरद पवार याचं बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकं पण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण ) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद ) कधी मिळणार… याची प्रतिक्षा असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सध्या फेरिवाल्या संदर्भात काम करत आहोत. पण, राजकारणात पण फेरीवाले असतात. असा टोमणा त्यांनी मंचावर उपस्थित असलेल्या खासदार संजय काकडे यांना मारला.

COMMENTS