मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याच्या तयारीत भाजप असून या निवडणुका फेब्रुवारी – मार्च 2019 ला घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
दरम्यान भाजपा सरकारची पुढील वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये एकत्र निवडणुका घेण्याची तयारी असल्याचं यावेळी पवार यांनी म्हटलं असून त्यांनी पक्षाच्या बैठकीत नेत्यांना एकत्र निवडणुकीची कल्पना दिली आहे. त्यादृष्टीने तयार राहण्याचे आदेशही शरद पवार यांनी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शरद पवार यांनी निवडणुकीसंदर्भात नेत्यांशी चर्चा केली आहे.
COMMENTS