शरद पवार – राजू शेट्टी यांच्यात दिल्लीत गुफ्तगू, चर्चेचा तपशील देण्यास राजू शेट्टींचा नकार !

शरद पवार – राजू शेट्टी यांच्यात दिल्लीत गुफ्तगू, चर्चेचा तपशील देण्यास राजू शेट्टींचा नकार !

दिल्ली – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील देण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला आहे. मात्र भाजपच्या भूमिकेमुळे त्यांचे मित्र पक्ष साथ सोडत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनंतर शिवसेनेने साथ सोडली, आंध्र प्रदेशातील चंद्रबाबू नायडू यांचा पक्षही एनडीएतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भाजपला आता पुन्हा सत्ता मिळवणं अवघड असल्याचं राजू शेट्टी म्हणाले.

पवार आणि शेट्टी हे एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. मात्र गेल्या काही दिवसात राजकीय परस्थिती बदलल्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद निर्माण झाला आहे. राजु शेट्टी यांच्या पुढाकाराने मुंबईत घेतलेल्या संविधान रॅलीमध्ये पवार सहभागी झाले होते. त्यानंतर आता दिल्लीत शेट्टी यांनी पवार यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. भाजप विरोधातील रणनितीबाबत आणि राज्यातील राजकारणाताबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

COMMENTS