परत जायचे तर पुण्यात आले कशाला ? – पवार

परत जायचे तर पुण्यात आले कशाला ? – पवार

मुंबई – भाजपमधील एक नेता मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन, असे म्हणत असताना आता दुसरे नेते मी परत जाईन परत जाईन, असे म्हणायला लागले आहेत असे नमूद करत परत कोल्हापूरला जायचेच होते तर तुम्ही पुण्यात आलेच कशाला, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला.

अटल स्मृती संस्कृती पुरस्कार वितरण समारंभात चंद्रकात पाटील यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामध्ये ते म्हणाले होते की सर्व जण पुण्यात सेटल होण्यासाठी येतात. पण मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे. यावर अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

पुण्यात विधान भवन या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींशी पवार यांनी संवाद साधला. पुन्हा येईन, परत जाईन’, असे म्हणता पण मुळात तुम्हाला बोलावलंच कुणी होतं?, असा तीरकस सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये निवडणूक लढवून मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय केला आहे, असेही पवार म्हणाले.

सरकार गेल्यामुळे भाजपच्या नेत्यांचा तोल सुटला आहे. राष्ट्रवादीचे आमदार फोडताना त्यांना गार गार वाटत होतं. त्यामुळे आता आमच्या पक्षात आमदार येत असतील तर त्यांना वाईट वाटण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.

COMMENTS