मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी ट्विटरवरुन अत्यंत वादग्रस्त विधान करणा-या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. मुंबईत अधेरी परिसरातून त्याला अटक केली आहे. नितीन शिसोदे असं त्या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे.पवार यांच्यावर अत्यंत आक्षेपार्य लिखाण केल्यामुळे विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
शिसोदे यानेच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिचे फेक ट्विटर अकाऊंट तयार केले होते. अखेर नितीन शिसोदेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. सारा तेंडुलकर ही लंडन मध्ये शिक्षण घेत असल्यामुळे सचिन तेंडुलकर यांच्या पीएने या संदर्भात तक्रार दाखल केली होती. ज्या मोबाईलच्या मदतीने शिसोदे अकाऊंट ओपन करायचा त्याच्या लोकेशन आणि आयपी एड्रेसवरुन त्याला अटक करण्यास सायबर सेलला यश आलं आहे.
Mumbai: A Software Engineer Nitin Shishode arrested from Andheri on charges of creating a fake Twitter handle of Sara Tendulkar, daughter of Sachin Tendulkar and tweeting objectionable comments against NCP chief Sharad Pawar
— ANI (@ANI) February 8, 2018
COMMENTS