पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार, भाजपच्या सहयोगी माजी खासदाराची भविष्यवाणी !

पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार, भाजपच्या सहयोगी माजी खासदाराची भविष्यवाणी !

पुणे – पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, अशी राजकीय भविष्यवाणी भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं असल्याचं काकडेंनी म्हटल आहे.

दरम्यान सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही काकडे यांनी शिवसेनेला विचारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक येथे काल महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पुढील निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचं आहे. तसेच पुढील निवडणुकाही एकत्र लढवायच्या आहेत, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्याची माहिती आहे.

त्यानंतर आज काकडे यांनी पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, अशी राजकीय भविष्यवाणी भाजपचे सहयोगी माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल असं काकडे म्हणाले आहेत.

COMMENTS