मुंबईत पेट्रोल 90 रुपये, तर दिल्लीत 82 रुपये, एवढा फरक का ? हेच अच्छे दिन का ? इतर राज्यात कसं मिळतं पेट्रोल ?

मुंबईत पेट्रोल 90 रुपये, तर दिल्लीत 82 रुपये, एवढा फरक का ? हेच अच्छे दिन का ? इतर राज्यात कसं मिळतं पेट्रोल ?

मुंबई – देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दररोजच्या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. गेली अनेक दिवस पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे. मात्र इतर शहरांची तुलना करताना महाराष्ट्रामध्ये आणि मंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे सर्वाधिक दर आहेत. मुंबईत आज पेट्रोलचे दर 90 रुपये 8 पैसे तर तेच पेट्रोल दिल्लीत जवळपास 8 रुपयांनी स्वस्त म्हणजेच 82 रुपये 78 पैशांनी मिळतंय.

तीच परिस्थिती डिझेलची आहे. मुंबईत एक लिटर डिझलला 78 रुपये 58 पैसे मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत एक लिटर डिझलला 74 रुपये 2 पैसे मोजावी लागत आहे. मुंबईकरांना दिल्लीकरांपेक्षा एक लिटर डिझेलसाठी तबब्ल साडेचाररुपये जास्त मोजावे लागतात. इतर अनेक राज्यात महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी आहेत. मग महाराष्ट्रताचं एवढं महाग इंधन का असा सवाल आता राज्यातली जनता करु लागली आहे. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील हेच का अच्छे दिन असा सवालही सर्वसामान्य जनता करु लागली आहे.

दिल्लीमध्ये तुलनेत एवढं स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळण्याचं कारण म्हणज्ये दिल्लीत इंधनवार असलेला कमी टॅक्स. त्याच्या उलटी परिस्तिती महाराष्ट्रत आहे. महाराष्ट्र पेट्रोलवर सर्वाधिक म्हणज्येच 25 टक्के व्हॅट लावला जातो. त्याच्याशिवाय 9 टक्के सरचार्चही लावला जातो. तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट आणि 1 टक्का सरचार्ज लावला जातो. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्र एवढं महाग पेट्रोल आणि डिझलं राज्यातल्या जनतेला खरेदी करावं लागतं. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यात पेट्रोलनं 90 पार केली आहे.

आजचे पेट्रोलचे दर

मुंबई – 90.08 रुपये

दिल्ली – 82.78 रुपये

बंगळुरु – 83.37 रुपये

लखनौ – 84.54 रुपये

कोलकत्ता – 87.70 रुपये

हैदराबाद – 85.17  रुपये

गुवावहटी – 85.88 रुपये

पटना  – 91.96 रुपये

COMMENTS