काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी केली अटक !

काँग्रेसच्या माजी आमदाराला पोलिसांनी केली अटक !

चंद्रपूर – काँग्रेसच्या माजी आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विनयभंगाच्या आरोपाखाली त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. राजुरा येथील एका नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने प्राचार्य गुरुराज कुलकर्णी, सुभाष धोटे आणि अरुण धोटे यांच्या विरोधात शरीर सुखाची मागणी केल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे राजुरा वसतिगृह येथील लैंगिक शोषण प्रकरण आणि आदिवासी मुलींबद्दल केलेल्या असभ्य वक्तव्यानंतर पुन्हा एकदा सुभाष धोटे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

दरन्यान याआधी राजुरा येथील शाळेत आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात असंवेदनशील वक्तव्य केल्याने सुभाष धोटेंवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ते जामीनावर आहेत. त्यानंतर आज विनयभंगाच्या आरोपाखाली
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे आणि राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

COMMENTS