म्हणून बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलतोय – पंतप्रधान मोदी

म्हणून बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलतोय – पंतप्रधान मोदी

सोलापूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राचा दौरा केला आहे. या दौय्रादरम्यान त्यांनी सोलापुरातील विविध विकासकामांचं उद्धाटन केलं आहे. यावेळी विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका केली आहे. देशाची जनता चौकीदाराच्या पाठीशी उभी आहे म्हणून अनेक बड्या-बड्या लोकांचं आव्हान मी समर्थपणे पेलत असल्याच मोदींनी म्हटलं आहे.चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो असा टोलाही यावेळी मोदींनी काँग्रेसला लगावला.

दरम्यान काल लोकसभेत एक ऐतिहासिक विधेयक मंजूर झालं. आर्थिकदृष्ट्या गरीब सवर्णांना 10% आरक्षणावर शिक्कामोर्तब झाल्याने सबका साथ-सबका विकास हा मंत्र अधिक मजबूत झाला. प्रत्येक समाजाला विकासाची संधी मिळावी आणि अन्यायाची भावना नष्ट व्हावी या उद्देशाने आम्ही जनतेच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित असल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

तसेच या दौय्रादरम्यान ते शिवसेना-भाजपच्या युतीबाबतही काय बोलतील याकडे लक्ष लागलं होतं. परंतु यावेळी मोदींनी युतीबाबत उल्लेखही केला नसल्यामुळे शिवसेना-भाजपच्या युतीचा सस्पेन्स कायम असल्याचं दिसत आहे.

COMMENTS