पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली खंत, “अनेक खासदार माझ्या ‘त्या’ मेसेजला उत्तरच देत नाहीत !”

पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली खंत, “अनेक खासदार माझ्या ‘त्या’ मेसेजला उत्तरच देत नाहीत !”

दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी झालेल्या भाजप संसदीय दलाच्या बैठकीत खासदारांबाबत एक खंत व्यक्त केली आहे. मी दररोज सकाळी सर्व खासदारांना गुड मॉर्निंगचा संदेश पाठवतो परंतु या संदेशाचं उत्तर मला चार ते पाच खासदार वगळता कोणीच देत नसल्याचं ते म्हणाले. त्यावेळी या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री आणि खासदार उपस्थित होते.तसेच या बैठकीदरम्यान मोदींनी खासदारांशी संवाद साधत असताना ही खंत व्यक्त केली आहे.

दरम्यान त्यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी खासदारांप्रती नाराजी व्यक्त केली आहे. माझा मेसेज पाहून मला दररोज उत्तर द्या, असं आवाहन केलं. तसेच प्रत्येकाने नरेंद्र मोदी अॅपचा उपयोग करावा. दररोज ते पाहावे, अशी सूचनाही त्यांनी सर्व खासदार आणि मंत्र्यांना केली.

COMMENTS