कार्यकाळ पूर्ण केलेल्या खासदारांना निरोप, राज्यसभेत सचिनची कमतरता जाणवणार – पंतप्रधान मोदी

कार्यकाळ पूर्ण केलेल्या खासदारांना निरोप, राज्यसभेत सचिनची कमतरता जाणवणार – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – कार्यकाळ पूर्ण झालेल्या खासदारांना आज संसदेतून निरोप देण्यात आला. सचिन तेंडुलकरसह राज्यसभेतील ४० खासदारांचा कार्यकाळ आज संपला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सचिनसह सर्व खासदारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी काहींचं कौतुक केलं तर काहींना चिमटे देखील काढले आहेत. मोदींनी उपसभापती प्राध्यापक पी जे कुरियन यांच्या कामाचं कौतुक केलं आहे तर राज्यसभेत सचिनची कमतरता जाणवणार असल्याचं म्हटलं आहे.  विशेष म्हणजे विरोधकांच्या सततच्या गदारोळाने स्थगित होणारी राज्यसभा आज मात्र सुरळीतपणे सुरू असल्याची पहावयास मिळालं आहे.

दरम्यान यावेळी तिहेरी तलाकचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेतील काही सदस्य या ऐतिहासिक निर्णयाचे वाटेकरी बनले नसल्याचं म्हटलं आहे. अनेक सदस्यांना वाटत असेल की ऐतिहासिक निर्णयात सहभागी होऊन निवृत्त व्हावं. परंतु, त्यांना हे सौभाग्य मिळालं नसून ही सल त्यांच्या मनात कायम राहील..

 

 

COMMENTS